शिवसेनेची मराठवाड्यात २०१९ निवडणुकीची जोरदार तयारी

एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिवसेनेने मराठवाड्यातून जोरदार तयारी सुरू केली आहे. 

Updated: Feb 9, 2018, 06:01 PM IST
शिवसेनेची मराठवाड्यात २०१९ निवडणुकीची जोरदार तयारी

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिवसेनेने मराठवाड्यातून जोरदार तयारी सुरू केली आहे. 

काल झाली बैठक

काल शिवसेना भवनात उद्धव ठाकरे आणि मराठवाड्याचे समन्वयक विश्वनाथ नेरूरकर यांनी मराठवाड्यातील आमदार, माजी आमदार आणि नेत्यांची बैठक घेतली. 

२३ नेत्यांकडे जबाबदारी

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हातात हात न देता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. त्यामुळे शिवसेना आत्तापासूनच कामाला लागली आहे. शिवसेनेने मराठवाड्यासह, नगर, सोलापूर जिल्ह्यात शिवसेना निवडणुकपूर्व पाहणी करणार आहे. ही पाहणी करण्याची जबाबदारी मराठवाड्यातील शिवसेनेच्या २३ स्थानिक नेत्यांकडडे देण्यात आली आहे.

ग्रामीण नेत्यांकडे पहिल्यांदाच जबाबदारी

प्रत्येकावर विधानसभेच्या तीन मतदारसंघांची पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईतील नेते सोडून ग्रामीण भागातील नेत्यांना पहिल्यांदा मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या नेत्यांना पाहणीची जबाबदारी दिली आहे. 

काय होणार पाहणी?

पाहणीमध्ये मतदारसंघाची सध्याची स्थिती, मतदारसंघात शिवसेनेची पक्ष बांधणी कशी आहे, शिवसेनेचे संभाव्य उमेदवार कोण असू शकता, भाजपा आणि इतर पक्षांची मतदारसंघातील स्थिती, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असू शकतो याचा समावेश आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close