शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठिशी - उद्धव ठाकरे

शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या पाठिशी असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय आहे.

Updated: Aug 13, 2017, 10:00 AM IST
शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठिशी - उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या पाठिशी असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बरबटलेले आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर टीका करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी विरोधकांवर केला आहे. विरोधकांनीही यानिमित्ताने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. खुद्द उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही राजीनामा दिल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. झी २४ तासला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजीनामा दिल्याचं मान्य केलंय. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. चौकशीअंती जो काही निष्कर्ष असेल तो मान्य असेल असं सुभाष देसाई यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलं आहे.