'पर्यावरण'प्रेमी शिवसेनेचा मेट्रो आणि फटाकेबंदीला विरोध

शिवसेना नक्की पर्यावरण प्रेमी आहे का? हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे एकाच दिवशी पर्यावरणाबाबत शिवसेनेनं घेतलेल्या दोन भूमिका. 

Updated: Oct 11, 2017, 11:45 PM IST
'पर्यावरण'प्रेमी शिवसेनेचा मेट्रो आणि फटाकेबंदीला विरोध  title=

मुंबई : शिवसेना नक्की पर्यावरण प्रेमी आहे का? हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे एकाच दिवशी पर्यावरणाबाबत शिवसेनेनं घेतलेल्या दोन भूमिका. प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं घातलेल्या फटाकेबंदीचा शिवसेनेनं विरोध केला आहे. तर निसर्गाची हानी होत असेल तर मेट्रो-३ ला विरोध कायम राहिल, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे. त्यामुळे पर्यावरणावरून शिवसेनेनं एकाच दिवशी घेतलेल्या दोन भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

मेट्रोला शिवसेनेचा विरोध

प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायायलायनं दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही फटाकेविक्रीवर बंदी आणण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. या बंदीला मात्र शिवसेनेनं विरोध केला आहे.

आता पंचांग फाडून टाका आणि लोकांना सांगा तुमचे सण बंद करा. तुम्ही आहात तसेच जगताय हे खूप झालं, असा आदेश काढून टाका म्हणजे सणावाराचा विषय संपून जाईल. मग फटाकेही राहणार नाहीत आणि सणही नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. शांततेचा अतिरेक झाला तर असंतोषाचा स्फोट होईल आणि तो सगळ्या शांततेचा भंग केल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणलेत. 

फटाकेबंदीलाही शिवसेनेचा विरोध