शिवसेनेने सनातनची पाठराखण करणे थांबवावे - नवाब मलिक

शिवसेनेला नवाब मलिकांचा सल्ला

Updated: Aug 21, 2018, 11:47 AM IST
शिवसेनेने सनातनची पाठराखण करणे थांबवावे - नवाब मलिक  title=

मुंबई : अनेक घटनांमध्ये सनातन संस्थेचे कार्यकर्ते सामील असल्याचे निष्पन्न होवून त्यांच्याकडे स्फोटकेही सापडली आहेत. काहींना अटकही झाली होती. त्यावेळी शिवसेनेने सनातन संस्थेची पाठराखण केली होती .त्यामुळे आता तरी शिवसेनेने जागे व्हावे आणि सनातनची पाठराखण करणे थांबवावे नाही तर शिवसेनेचे असे अनेक लोक त्यांच्या या प्रकाराला बळी पडतील.असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेला दिला आहे.

सरकारकडून बंदीचा प्रस्ताव

राज्य सरकारने सनातनवर बंदी आणण्याचा नव्याने प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे. आधीच्या प्रस्तावात तृटी होत्या त्यानंतर नवा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे केसरकर यांनी सांगितले.  ATS नेच सर्व माहिती CBI ला दिली असून ATS च्या कामगिरीचा सरकारला अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

सनातनवर बंदीची मागणी

दाभोळकर खून प्रकरणात अटक करण्यात आलेले लोक सनातन संस्थेशी संबंधित असून त्यांचा राज्यात घातपात करण्याचा कट होता असं मत विधानसभा विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी मांडलं आहे. 'सनातनवर बंदी घाला अशी मागणी आम्ही गेले दोन वर्ष करतोय. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एटीएसचे हात बांधले आहेत. सनातनवर कारवाई होऊ नये यासाठी दबाव टाकला जातोय', असा आरोपही विखे पाटलांनी केला आहे. याबाबत कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना भेटणार असून सनातनचे प्रमुख जयंत आठल्ये यांना अटक करण्याची मागणी विखे पाटलांनी केली.