नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट, रेल्वेची विशेष सेवा

३१ डिसेंबरला मुंबईच्या रेल्वे आणि बससेवा सज्ज झाल्या आहेत.  बेस्टने ३१ डिसेंबरला रात्री १० वाजल्यापासून प्रवाश्यांसाठी जादा बससेवा आणि विशेष लोकल सुरु केल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 29, 2017, 12:45 PM IST
नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट, रेल्वेची विशेष सेवा title=

मुंबई : ३१ डिसेंबरला मुंबईच्या रेल्वे आणि बससेवा सज्ज झाल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर अख्ख्या मुंबईचा फेरफटका मारतात आणि मुंबईतल्या चौपट्या, मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी नववर्षाचं स्वागत करतात. त्यासाठी बेस्टने ३१ डिसेंबरला रात्री १० वाजल्यापासून प्रवाश्यांसाठी २० जादा बससेवा सुरु केल्या आहेत.

मध्यरात्रीपासूनच विशेष लोकल फेऱ्या

तर पश्चिम आणि मध्य रेल्वेकडूनही ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच विशेष लोकल फे-या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चगेट ते विरार, कल्याण ते सीएसएमटी अशी लोकल असणार आहेत.

सीएसएमटी ते पनवेल विशेष लोकल

हार्बरवरही लोकल सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते पनवेल अशा बारा विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. नववर्षाच्या स्वागतादरम्यान प्रवाश्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.