सुकाणू समितीने सरकारचा जीआर फाडला

Last Updated: Monday, June 19, 2017 - 21:11
सुकाणू समितीने सरकारचा जीआर फाडला

मुंबई : राज्य सरकारने आपल्या मागण्यांची बोळवणं केल्याचं लक्षात आल्यानंतर, सुकाणू समितीची सरकारशी बातचीत फिस्कटल्याबरोबर, सरकारचा जीआर फाडला आणि जाळला आहे. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सुरू असताना शेतकरी नेत्यांनी सह्याद्री अतिथिगृहाबाहेर घोषणाबाजी केली आहे.

सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी सुकाणू समितीने अमान्य केली आहे, सरकारने आम्हाला न विश्वासात घेता जे निकष लावले आहेत, त्यावर शेतकरी संतापले असल्याचंही सुकाणू समितीने सरकारला सांगितले आहेत.मात्र तरीही सरसकट कर्जमाफी देता येणार नसल्याची भूमिका सरकारने कायम ठेवल्याने सुकाणू समितीने सरकारचा सुधारीत जीआर बाहेर येऊन जाळला.

First Published: Monday, June 19, 2017 - 21:06
comments powered by Disqus