बाप्‍पांच्‍या आगमनाच्‍या पूर्वसंध्‍येला खरेदीसाठी गर्दी

 लाडक्‍या बाप्‍पांच्‍या आगमनाच्‍या पूर्वसंध्‍येला बाजारात खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली आहे.  

Updated: Sep 12, 2018, 05:17 PM IST
बाप्‍पांच्‍या आगमनाच्‍या पूर्वसंध्‍येला खरेदीसाठी गर्दी

मुंबई : गणेशोत्‍सवाला उद्यापासून सुरवात होतोय. लाडक्‍या बाप्‍पांच्‍या आगमनाच्‍या पूर्वसंध्‍येला बाजारात खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली आहे. गणेशोत्‍सवासाठी आरास, सजावटीचे साहित्‍य तसेच पूजेसाठी, शोभेसाठी फुले, फळे यांची खरेदी मोठया प्रमाणावर सुरू आहे. गौरीपूजेसाठी लागणारी सुपेही बाजारात विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत. 

यंदा महागाईचा फटका गणेशभक्‍तांना बसतो आहे. प्रसाद,मोदक यांचे भाव किलोमागे 50 रूपयांनी वाढले आहेत तर फळांचा भावदेखील वधारला आहे. काही दिवसांपूर्वी  भाव मिळत नसलेला झेंडूदेखील भाव खावू लागला आहे. आकाराप्रमाणे 150 ते 200 रूपये असा सध्‍या झेंडूचा दर आहे. बाजारात भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलीसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close