कोकणातील नाणार प्रकल्प हटवणारच - उद्धव ठाकरे

'नाणार प्रकल्प हिवाळी अधिवेशनात हटवणारच' असा शब्दच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय.  

Updated: Nov 28, 2017, 06:34 PM IST
कोकणातील नाणार प्रकल्प हटवणारच -  उद्धव ठाकरे title=

मुंबई : 'नाणार प्रकल्प हिवाळी अधिवेशनात हटवणारच' असा शब्दच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय. कोकण रिफायनरी विरोध संघर्ष संघटनेला त्यांनी हे आश्वासन दिलंय. संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी झी 24 तासला ही माहिती दिलीय. शिवाय शिवसेनेवरच्या टीकेबद्दलही वालम यांनी यावेळी माफी मागितली.

संघर्ष संघटनेची बैठक मातोश्रीवर 

दरम्यान, कोकण रिफायनरी विरोध संघर्ष संघटना पदाधिकारी आणि नाणार ग्रामस्थांशी उद्धव ठाकरे यांनी आज चर्चा करून प्रकल्पाला त्यांच्या विरोधाची कारणं जाणून घेतली. रत्नागिरीतील वादग्रस्त नाणार रिफायनरीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. याच विरोधाच्या पार्श्वभूमीवर कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेची बैठक मातोश्रीवर सुरु होती.

वालम यांना दूर ठेवण्यात आलं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक सुरु आहे. मात्र या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांना दूर ठेवण्यात आलं होतं. याबाबतचं वृत्त झी मीडियानं दुपारी 1 वाजताच्या बुलेटिनला प्रसारीत केलं. याबाबत वालम यांची भूमिका झी मीडियानं मांडली. या वृत्तानंतर वालम यांना मातोश्रीवर सुरु असलेल्या बैठकीला बोलावून घेण्यात आलंय.

 शिवसेनेला जाब विचारणारी भूमिका

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाणीवपूर्वक बैठकीत सहभागी करुन घेतलं नाही, असा आरोप वालम यांनी केला होता. तसंच माध्यमांमध्ये शिवसेनेला जाब विचारणारी भूमिका मांडल्याने बैठकीपासून दूर ठेवल्याचा आरोपही वालम यांनी केला होता.