मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढलेला तरुण ताब्यात

शेतमालाच्या हमीभावासाठी तरुणानं मंत्रालयाच्या इमारतीवर दोन तास मोठा ड्रामा केला. आपल्या मागण्यांसाठी मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढून आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेतलं.

Updated: Nov 10, 2017, 07:49 PM IST
मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढलेला तरुण ताब्यात title=

मुंबई : शेतमालाच्या हमीभावासाठी उस्मानाबादच्या तरुणानं मंत्रालयाच्या इमारतीवर दोन तास मोठा ड्रामा केला. आपल्या मागण्यांसाठी मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढून आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेतलं.

ज्ञानेश्वर साळवे असं या तरुणाचं नवा असून तो तुळजापूरचा रहिवासी आहे. शेतमालाला हमीभावाच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरनं कृषी मंत्र्यांना भेटण्याचा हट्ट धरला. मात्र पोलिसांनी त्याच्याशी मोबाईलवर संवाद साधत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र लेखी आश्वासनाशिवाय हा तरुण इमारतीवरून खाली उतरण्यास तयार नव्हता. 

अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी घटनास्थळी येऊन त्याला लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर अग्निशमनदलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांकडे सुपुर्द केलं. मात्र या तरुणाला समजूत घालताना पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. तसंच हा सर्व ड्रामा पाहण्यासाठी मंत्रालयाच्या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.