आरे कॉलनीत दोन तरुणींची आत्महत्या, भावाला धाडला शेवटचा मॅसेज

या दोघींनी नेमकी आत्महत्या का केली?

Updated: Nov 21, 2018, 01:40 PM IST
आरे कॉलनीत दोन तरुणींची आत्महत्या, भावाला धाडला शेवटचा मॅसेज  title=

मुंबई : गोरेगाव आरे कॉलनीत खंबाटा पाड्यात असलेल्या धक्कादायक प्रकार घडलाय. विहिरीत दोन १६ वर्षांच्या मुलींचा मृतदेह सापडल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा समोर आली आहे. या दोघींनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या मुलींनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला मॅसेज पाठवला होता. या घटनेनंतर तत्काळ मुलीच्या भावाने घटनास्थळी धाव घेतली. त्यादरम्यान ही धक्कादायक घटना समोर आली. माहिती मिळाल्यावर तात्काळ आरे पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

या दोघींनी नेमकी आत्महत्या का केली? आत्महत्येसाठी कुणी प्रवृत्त केलं का? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे आहेत. पोलिसांनी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात या दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.