VIDEO : धावत्या रेल्वेत प्रवाशांसमोर कपडे काढून तृतियपंथीयाची दादागिरी

'इतका बीभत्स प्रकार आज पर्यंत पहिला नव्हता यावर कारवाई झाली पाहिजे...'

Updated: Dec 15, 2018, 11:55 AM IST
VIDEO : धावत्या रेल्वेत प्रवाशांसमोर कपडे काढून तृतियपंथीयाची दादागिरी  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : तृतीयपंथी समाजाकडे उर्वरीत समाजाने करूणेनं पाहावं असं मानलं जातं... प्रत्येकापुढे हात पसरून तृतीयपंथी समाज आपला उदरनिर्वाह चालवतो. मात्र ही एक बाजू असली तरी काही तृतीयपंथींचा एक बीभत्स आणि चीड आणणारा प्रकार समोर आलाय. तृतीय पंथीयाकडून प्रवाशांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून पैसे मागणे हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय... हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय... एका लांब पल्ल्याच्या गाडीत ही घटना घडलीय... कहर म्हणजे स्वतःच्या अंगावरील कपडे काढून नग्न होऊन हे तृतीयपंथी प्रवाशांना धमकावत आहेत, घाबरवत आहेत, असं या व्हिडिओतून समोर येतंय.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, इतका बीभत्स प्रकार आज पर्यंत पहिला नव्हता यावर कारवाई झाली पाहिजे... हे प्रकार थांबले नाहीत तर भविष्यात अनर्थही घडू शकेल, अशी धास्तावलेली प्रतिक्रिया रेलयात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी व्यक्त केलीय.  

लोकलमध्ये, लांब पल्ल्याच्या गाडीत हे तृतीयपंथी पैसे मागताना दिसणे ही नवी गोष्ट नाही. त्यातच आता यात खरे तृतीयपंथी कोण आणि तोतये कोण हे ओळखणं कठीण... अनेकदा यांची तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.  

तृतीयपंथी समाजाबाबत समाजात दयेची भावना असते. अनेकजण या समाजाला मदत म्हणून विविध उपक्रम राबवत असतात. मात्र मदत घेण्यासाठी इतका बीभत्स प्रकार करत लोकांना घाबरवणाऱ्यांच्या दादागिरीला चाप लावणं गरजेचं आहे. तृतीयपंथीतल्या विकृत वृत्तीवर वेळीच कायदेशीर कारवाई आवश्यक आहे.