विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचे निधन

राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचे येथे प्रदीर्घ आजाराने रात्री निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

Updated: Jan 4, 2018, 11:54 PM IST
विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचे निधन title=

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचे येथे प्रदीर्घ आजाराने रात्री निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांनी अखेरचा श्वास बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेतला आहे. उद्या ठाण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवर आणि राजकीय क्षेत्रातील लोकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

डावखरे यांनी महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणात प्रवेश केला. ठाण्यात शिवसेनेची सत्ता असतानाही काही भाजपच्या नगरसेवकांशी हाताशी धरले आणि चमत्कार करुन दाखवला. १९८७मध्ये प्रथमच ठाणे महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आणली होती. 

१९९२मध्ये ते राज्य विधान परिषदेवर निवडून आले. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीतही त्यांचा सात मतांनी विजय झाला. त्यानंतर ते विधान परिषदेचे सभापती म्हणून काम पाहिले. डावखरे यांच्या सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी मैत्रीचे संबंध राहिलेत.