कळंबोलीजवळ पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटलीय. कळंबोलीजवळ सायन-पनवेल महामार्गाजवळ ही पाईपलाईन फुटलीय. 

Updated: Sep 23, 2017, 03:52 PM IST
कळंबोलीजवळ पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया title=

नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटलीय. कळंबोलीजवळ सायन-पनवेल महामार्गाजवळ ही पाईपलाईन फुटलीय. 

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणा-या मोरबे धरणाची ही पाईपलाईन आहे. पाईपलाईन फुटल्याने 30 फूट उंच पाण्याचे फवारे उडत आहे. यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झालीय.