राम कदम यांचा पाय आणखी खोलात; महिला आयोगाकडून नोटीस

आठ दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश

Updated: Sep 6, 2018, 11:06 PM IST
राम कदम यांचा पाय आणखी खोलात; महिला आयोगाकडून नोटीस title=

मुंबई: घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान बोलताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत बेताल वक्तव्य केले. याची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करून आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश राम कदम यांना दिले आहेत. 

महिलांबाबत वक्तव्य करताना आमदार राम कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले होते. आता स्युमोटो दाखल केल्यानंतर राम कदम यांनी या प्रकरणात आठ दिवसात स्पष्टीकरण द्यावे, असेही आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत. 

तत्पूर्वी लोकांचा रोष पाहता भाजपनेही राम कदम यांचे पंख कापले आहेत. पक्षाकडून त्यांच्या प्रवक्ते पदावर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही वृत्तवाहिनीवर पक्षाची बाजू मांडण्यासाठी जाऊ नका, अशा सूचना पक्षाने कदम यांना दिल्या आहेत.