महिला रिक्षाचालकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

पूर्व उपनगरातल्या मुलुंड परिसरातील १०० महिला रिक्षाचालकांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.

Updated: Dec 5, 2017, 12:28 PM IST
महिला रिक्षाचालकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट title=

मुंबई : पूर्व उपनगरातल्या मुलुंड परिसरातील १०० महिला रिक्षाचालकांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.

लर्निंग लायसन्सपासून ते परमिटपर्यंत मनसेच्या वाहतुक सेनेनं केलेल्या मदतीसाठी या महिलांनी पक्षाचे आभार मानले, मात्र त्याचबरोबरच परमिटसाठी शासनानं वाढवलेलं शुल्क कमी करावं अशी विनंती या महिलांनी राज ठकरेंकडे केली. पूर्वी 200 शुल्क आकारले जात असताना यंदाच्या वर्षी ते थेट १५ हजार पर्यंत वाढवण्यात आलंय.. राज ठाकरे यांनीही सर्व महिलांचं म्हणणे नीट जाणून घेतले, आणि त्यांच्या मागणीसाठी राज्य सरकारकडे गांभीर्याने पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं.