कोचिंग क्लासच्या इंटिग्रेटेड कोर्सविरोधात युवासेनेचं आंदोलन

मुंबईत ज्युनियर कॉलेज आणि बड्या कोचिंग क्लासेसचे इंटिग्रेटेड कोर्स सुरु असल्याचा आरोप करत युवासेनेने शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांना घेराव घातला. 

Updated: Jul 17, 2017, 04:41 PM IST
कोचिंग क्लासच्या इंटिग्रेटेड कोर्सविरोधात युवासेनेचं आंदोलन

मुंबई : मुंबईत ज्युनियर कॉलेज आणि बड्या कोचिंग क्लासेसचे इंटिग्रेटेड कोर्स सुरु असल्याचा आरोप करत युवासेनेने शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांना घेराव घातला.

इंटीग्रेटेड कोचिंग म्हणजेच कॉलेज आणि कोचिंग क्लासचे टाय अप असताना विद्यार्थी कॉलेजला न जाता केवळ कोचिंगमध्येच शिक्षण घेतात. यासाठी कोचिंग क्लास लाखो रुपयांची फी वसूल करतात. यावर शिक्षण विभागाचा अंकुश नसल्याचा युवा सेनेचा आरोप आहे.

इंटीग्रेटेड कोर्सला प्रवेश घेणे नियमबाह्य असताना त्याबाबत ऑनलाईन प्रवेश वेबसाईटमध्ये जनजागृतीच करण्यात आली नाही. त्यामुळे पालकांची दिशाभूल होत असल्याची तक्रारही करण्यात आली. याला स्थानिक शिक्षण निरीक्षकांचे अभय असल्याचा आरोपही युवा सेनेकडून करण्यात आला.

अशा कॉलेज आणि कोचिंग क्लासचं स्टिंग ऑपरेशन युवा सेनेकडून करण्यात आलंय. ज्याची प्रत शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांना देण्यात आली. दरम्यान अशा ज्यूनियर कॉलेजेसकडून खुलासा मागण्यात येईल असं आश्वासन उपसंचालकांनी दिलंय. 

 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close