अमेरिकन मंदीच्या भीतीने सेन्सेक्स आपटला!

अमेरिकेपुढे उभ्या राहिलेल्या कर्जाच्या संकटामुळे जग पुन्हा एकदा मंदीच्या गर्तेत अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.

Updated: Oct 9, 2011, 12:47 PM IST

[caption id="attachment_363" align="alignnone" width="300" caption="सेन्सेक्स"][/caption]

झी 24 तास वेब  टीम, मुंबई

 

अमेरिकेपुढे उभ्या राहिलेल्या कर्जाच्या संकटामुळे जग पुन्हा एकदा मंदीच्या गर्तेत अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. याच भीतीपोटी आज (शुक्रवार) जगभरच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. याचा फटका सेन्सेक्स ( BSE ) आणि निफ्टीला (NSE) बसला.

 

शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्समध्ये ४०० आणि निफ्टीत १२५ अंशांची घसरण झाली. तब्बल १३ महिन्यांनंतर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली. सातत्याने शेअरची विक्री सुरू असल्याने बाजार अद्याप सावरलेला नाही

 

दुपारी बाराच्या सुमारास विक्रीचा सपाटा सुरू असल्याने सेन्सेक्स ५४६.४० अंशांनी घसरला आणि १७, १४६. ७८ वर पोहोचला. निफ्टी १६६.९० अंशांनी घसरला आणि ५१६४.९० वर पोहोचला.बीएसईमध्ये रिअल इस्टेट, मेटल, आयटी, ऑटो, कॅपिटल गुड्स, एनर्जी आणि बँकिंग या सर्व क्षेत्रात दोन ते तीन टक्के घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण स्टरलाइट इंडस्ट्रीज, एचसीएल, रिलायन्स इन्फ्रा आणि टीसीएसच्या शेअरमध्ये झाली.

 

ग्लोबल मार्केट

अमेरिकेतील शेअर बाजारात गुरुवारी २००८ नंतरची सर्वात मोठी घसरण झाली. आधीच कर्जाचे संकट त्यात शेअर बाजारात झालेली घसरण यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपुढचे आव्हान आणखी कठीण झाले आहे. गुरुवारी डाऊ जोन्स ५०० अंशांनी घसरुन ११, ३८३.६८ वर पोहोचला. २१ जुलै २०११ पासून आतापर्यत डाऊ जोन्समध्ये सुमारे बाराशे अंशांची घसरण झाली आहे. २००८ पासूनची स्थिती पाहिल्यास ही डाऊ जोन्समधली एका दिवसातली सर्वात मोठी घसरण आहे.

 

जपानचा निक्की ३२५ अंशांनी घसरुन ९, ३३४.२६ वर पोहोचला. हाँगकाँगचा हँगसँग ९४८ अंशांनी घसरुन २०, ९३६.८१ वर पोहोचला. शांघाय कम्पोझिट ४७ अंशांनी घसरुन २, ६३७ वर पोहोचला.

Tags: