येडीयुरप्पांची रवानगी कोठडीत

कर्नाटकातील जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी 22 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. येडियुरप्पा यांच्या बरोबरच माजी मंत्री एस.एन.कृष्णनाथ शेट्टी यांचाही जामीन फेटाळण्यात आला. गुन्ह्याचं गांभीर्य पाहता या दोघांचा जामीन फेटाळल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलं.

Updated: Oct 15, 2011, 02:52 PM IST

झी 24 तास वेब टीम, बंगळुरू

 

कर्नाटकातील जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी 22 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. येडियुरप्पा यांच्या बरोबरच माजी मंत्री एस.एन.कृष्णनाथ शेट्टी यांचाही जामीन फेटाळण्यात आला.  गुन्ह्याचं गांभीर्य पाहता या दोघांचा जामीन फेटाळल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलं.  दोघेही मोठे राजकारणी असल्यानं साक्षीदारांवर दबाव आणू शकतील अशी शक्यता कोर्टानं व्यक्त केली.

 

[caption id="attachment_2356" align="alignleft" width="300" caption="येडीयुरप्पांना अटक"][/caption]

कर्नाटकातील जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचा जामीन अर्ज बंगळुरुच्या विशेष लोकायुक्त कोर्टानं फेटाळला आहे.  येडियुरप्पा यांच्याविरोधात सर्वसामान्य नागरिकांनी अनेक तक्रारी कोर्टात दाखल केल्या होत्या.

 

या तक्रारींवरील सुनावणी सुरु होती. येडियुरप्पांचे सहकारी एस एन कृष्णन्ना शेट्टी यांचाही राजीनामा फेटाळण्यात आला आहे.  मात्र त्यांचा मुलगा बी वाय राघवेंद्र आणि जावई सोहन कुमार याच्यासह 14 जणांना कोर्टानं दिलासा दिला आहे. विशेष लोकायुक्त कोर्टाचे न्यायाधिश एन के सुधींद्र यांनी या प्रकरणातील आरोपींना प्रत्येकी चार लाखांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

 

जामीन फेटाळला जाईल या शक्यतेमुळं य़ेडियुरप्पा आज कोर्टात हजर नव्हते.  मात्र त्यांचा मुलगा आणि जावई मात्र सुनावणीवेळी उपस्थित होते. राघवेंद्र यानं सरकारकडून अल्प दरात जमीन घेतली होती. त्यानंतर ही जमीन खाण मालकाला विकली होती. याच प्रकरणात 31जुलैला य़ेडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला होता. कोर्टाच्या या निर्णयामुळं मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी मुंबई दौरा रद्द केला आहे.

 

या प्रकऱणी कोर्टात येडियुरप्पा आले नाहीत.  जामीन फेटाळल्यावर अटकेसाठी लोकायुक्त पोलीस त्यांच्या घरी गेले.  तेव्हा ते घरात नव्हते.  त्यानंतर येडियुरप्पांनी कोर्टात शरणागती पत्करली. या प्रकरणी कायदेशीर लढाई देऊ अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे.  काँग्रेसला या प्रकरणी टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही असं भाजप प्रवक्ते नड्डा यांनी म्हटलय.

 

भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. येडियुरप्पा यांच्याविरोधात अनेक तक्रारी कोर्टात दाखल केल्या होत्या. भाजपा आता याप्रकरणी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.