घरकुल घोटाळा : महापौरांची कसून चौकशी

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जळगावचे महापौर सदाशिव ढेकळेंची एक तास कसून चौकशी करण्यात आलीए. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसंच घोटाळ्याचे तपास अधिकारी इशू सिंधू यांनी त्यांची चौकशी केली.

Updated: Feb 21, 2012, 01:26 PM IST

www.24taas.com, जळगाव

 

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जळगावचे महापौर सदाशिव ढेकळेंची एक तास कसून चौकशी करण्यात आलीए. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसंच घोटाळ्याचे तपास अधिकारी इशू सिंधू यांनी त्यांची चौकशी केली.

 

घरकुल घोटाळ्यात जळगावचे महापौर सदाशिव ढेकळे हे देखील संशयित आरोपी आहेत. या घोटाळ्यात पोलीस चौकशी करण्यात आलेले पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश जैन यांचीही चौकशी करण्यात आली होती. या घोटाळ्यात आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

 

आणखी संबंधित बातमी

 

घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांची चौकशी

 

संबंधित व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="40898"]