टीम इंडियाला दमवलं....

सिडनी टेस्टमध्ये दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं ४ आऊट ४८२ रन्सपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियन टीमकडे आता २९१ रन्सची आघाडी आहे. मायकल क्लार्क २५१ रन्सवर आणि माईक हसी ५५ रन्सवर नॉटआऊट आहे.

Updated: Jan 4, 2012, 12:34 PM IST

www.24taas.com, सिडनी

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

सिडनी टेस्टमध्ये दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं ४ आऊट ४८२ रन्सपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियन टीमकडे आता २९१ रन्सची आघाडी आहे. मायकल क्लार्क २५१ रन्सवर आणि माईक हसी ५५ रन्सवर नॉटआऊट आहे. तर भारताला पूर्ण दिवसभरात केवळ रिकी पॉन्टिंगची विकेट घेण्यात यश आलं. ईशांत शर्मानं पॉन्टिंगला १३४ रन्सवर आऊट केलं. तत्पूर्वी, रिकी पॉन्टिंग आणि मायकल क्लार्कनं चौथ्या विकेटसाठी २८८ रन्सची भक्कम पार्टनरशपि केली. त्यांची हीच पार्टनरशिप कांगारुंच्या इनिंगच वैशिष्ट्य ठरली.

 

मायकल क्लार्कनं शानदार डबल सेंच्युरी ठोकली. क्लार्कची टेस्ट करिअरमधील ही पहिली-वहिली डबल सेंच्युरी ठोकली आहे. पहिल्या टेस्टमध्ये त्याला फारशी कमाल करता आली नव्हती. मात्र या टेस्टमध्ये त्यानं याची कसर भरुन काढली. तर पन्टिंगनही टेस्ट करिअरमधील ४० वी सेंच्युरी झळकावली. ऑस्ट्रेलियानं सिडनी टेस्टवर आपली पकड मजबूत केली आहे. आता टीम इंडियाला टेस्टमध्ये कमबॅक करण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत.

 

सिडनी टेस्ट मध्ये पॉन्टिंगने शतक आणि क्लार्कने द्विशतक ठोकल्यानंतर आता माइक हस्साने देखील आपलं अर्धशतक झळकावलं आहे. फक्त ८६ बॉलचा सामना करत ५१ रन्स्ची दमदार खेळी केली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे, आतापर्यंत २८२ रन्सचा लीड ऑसी टीमने घेतला आहे.

 

सिडनीच्या उसळत्या पीचवर जिथे भारताने अक्षरश: नांगी टाकली त्याच सिडनीच्या मैदानावर ऑसी टीम खोऱ्याने धावा काढत आहे. त्यामुळे टीम इंडिया ही फक्त घरच्या मैदानावर शेर असते हे पुन्हा एकदा सिद्ध झालयं

 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क यांने कसोटीत पहिले व्दिशतक झळकावले.  त्याने दमदार खेळी करताना २०९ धावा केल्या.  रिकी पाँटिंग यांनी झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतावर आघाडी घेतली. यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचे दुसऱ्या कसोटी सामन्यावरही वर्चस्व निर्माण झाले आहे.

 

मायकल क्लार्कला साध दिली आहे ती २६ रन्सवर खेळणाऱ्या हसीने. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क यांने कसोटीत पहिले व्दिशतक झळकावले.  त्याने दमदार खेळी करताना २०९ धावा केल्या.  मायकल क्लार्क आणि रिकी पाँटिंग यांनी झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४०६ रन्स केल्या.

 

सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड  असतानाच रिकी पॉन्टिंगला ईशांत शर्माने सचिन तेंडुलकरवी झेलबाद केले.  रिकी पॉन्टिंग दीड शतकी खेळी करील असे वाटत असताना रिकीचा डाव १३४ वर संपुष्टात आला.

 

मात्र,  कर्णधार मायकल क्लार्क  एकाबाजुने किल्ला संभाळत आहे. तो २१५  रन्सवर खेळत आहे. त्याला हसीने साथ दिली आहे. हसी २४ रन्सवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या ४१६ रन्स झाल्या आहेत. सिडनी कसोटीवर ऑस्ट्रेलियानं आपली पकड मजबूत केली आहे. रिकी पॉन्टिंग आणि कॅप्टन मायकल क्लार्कनं टीम इंडियाच्या बॉलर्सना सळो की, पळो करुन सोडलं.

 

रिकी पॉन्टिंगनं टेस्ट करिअरमधील ४० वे शतकही पूर्ण केले. पॉन्टिंगनं तब्बल दोन वर्षानंतर शतक झळकावलं. त्यानं जानेवारी २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले होते. जवळपास ३३ इनिंग्जनंतर त्याला शतक पूर्ण करण्यात यश आलं. पॉन्टिंगनं आपल्या आवडत्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तब्बल सहाव्यांदा शतक ठोकलआहे. पॉन्टिंगप्रमाणे कॅप्टन मायकल क्लार्कचीही बॅट चांगलीच तळपली. क्लार्क नावाच्या प्रश्नाच उत्तर टीम इंडियाला सापडलच नाही. पहिल्य़ा सेशनप्रमाणेच दुस-या सेशनमध्येही कांगारुंनी आपलं वर्चस्व कायम राखलं.

 

ऑस्ट्रेलिया - 482/4 (116.0 ov)

टीम इंडिया (पहिला डाव) -  191