तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाची बाजी

तिस-या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत चुरशीची लढत पाहायला मिळाली. श्रीलंकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाला गुंडाळून अंतिम सामना खिशात टाकणार अशी स्थिती निर्माण झाली असताना खेळाडूंनी नांगी टाकली. त्यामुळे हा अंतिम सामना १६ रन्सनी ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि मालिकेत आपणच बाजीगर असल्याचे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाने कॉमनवेल्थ बँक एकदिवसीय क्रिकेट मालिका खिशात घातली.

Updated: Mar 8, 2012, 08:14 PM IST

www.24taas.com, अॅडलेड

तिस-या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत चुरशीची लढत पाहायला मिळाली. श्रीलंकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाला गुंडाळून अंतिम सामना खिशात टाकणार अशी स्थिती निर्माण झाली असताना  खेळाडूंनी नांगी टाकली. त्यामुळे हा अंतिम सामना १६ रन्सनी ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि मालिकेत आपणच बाजीगर असल्याचे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाने कॉमनवेल्थ बँक एकदिवसीय क्रिकेट मालिका खिशात घातली.

अंतिम  सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना, सर्वबाद २३१ रन्स केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, श्रीलंकेचा डाव ४८.५ षटकांत २१५ रन्संवर आटोपला. श्रीलंकेचा थरंगा (७१) आणि थिरिमाने (३०) तर कोणतेही फलंदाज खेळपट्टीवर फार काळ तग धरू शकले नाहीत.

ऑस्ट्रेलियाच्या मॅकायने ९.५ ओव्हरमध्ये अवघ्या २८ रन्सच्या मोबदल्यात श्रीलंकेचे ५ गडी बाद केले. तोच ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याखालोखाल ब्रेट लीने ३ विकेट घेतले. पण त्यासाठी त्याला ५९ रन्स द्याव्या लागल्या. त्या आधी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी ७५ रन्सची भागीदारी केली.

वाडे (४९) आणि वॉर्नर (४८) या दोघांचीही अर्धशतके मात्र थोडक्यात हुकली. ब्रेट लीने ३२ रन्सची भर घातली. श्रीलंकेचे महारुफ आणि हेरथ हे दोघे गोलंदाज चांगले चमकले. त्यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतले.

धावफलक

ऑस्ट्रेलिया - 231 (49.3 ov)

श्रीलंका - 215 (48.5 ov)

संबंधित आणखी बातमी

श्रीलंकेसमोर २३२ रन्सचे माफक आव्हान