चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांना काँग्रेसचा दे धक्का!!

Last Updated: Monday, April 16, 2012 - 14:11

www.24taas.com, चंद्रपूर

 

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकित काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मात्र चांगलाच धक्का बसणार असे दिसते आहे. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळत नाहीये. आतापर्यंत हाती आलेल्या निकालमध्ये काँग्रेसने २३ जागा, राष्ट्रवादीने २ जागांवर विजय मिळविला आहे.. तर  भाजपने २० जागा पटकावल्या आहेत. तर सेनेने ५ जागांवर विजय मिळविला आहे.

 

त्याचबरोबर आता मनसेनी चंद्रपूर पालिकेत प्रवेश केल्याने महाराष्ट्रात मनसेची घोडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील पाच पालिका निवडणुकीत राज ठाकरे यांचा करीश्मा  दिसून आला आहे.

 

मतमोजणी सुरू असून किती जागा मनसेला मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, मालेगाव आणि चंद्रपूर येथे खातं उघडून आपण पालिकेत आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे राज्यात आता ग्रामीण  भागात मनसेने आपले जाळे पसरविण्यात यशस्वी होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

 

 

 

 

 

 

 

First Published: Monday, April 16, 2012 - 14:11
comments powered by Disqus