'मराठी' नाटकाला आले 'सैफ-करीना' !

Last Updated: Thursday, February 9, 2012 - 15:22

www.24taas.com, मुंबई

 

रविंद्रनाथ टागोर यांच्या १५०व्या जयंती निमित्त ‘चित्रांगदा’ या नृत्य नाटिकेचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला आणि या नृत्य नाटिकेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी हजेरी लावली.

 

बॉलिवूडच्या या कपलने मराठी नृत्य नाटिकेला हजेरी का लावण्यामागचं कारण असं की सैफ अली खानची मुलगी सारा खान या नृत्य नाटिकेत काम करत आहे आणि म्हणूनच आपल्या मुलीला चिअर अप करण्यासाठी सैफ आणि करीनाने या नृत्य नाटिकेला हजेरी लावली. अर्थातच करीना-सैफच्या येण्याने या नृत्य नाटिकेलाही ग्लॅमर मिळालं.

 

चित्रांगदा आणि अर्जुन यांच्या प्रेमावर नाटकाची कथा आधारित आहे. यापुढेही या नाटकाचे प्रयोग करण्याचा दिग्दर्शकांचा मानस आहे. एकूणच सारा खानमुळे या नृत्य नाटिकेकडे संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष असणार हेच खरं.

First Published: Thursday, February 9, 2012 - 15:22
comments powered by Disqus