"इतक्यात लग्नाचा विचार नाही"- करीना

Last Updated: Wednesday, February 8, 2012 - 16:11

www.24taas.com, मुंबई

 

आगामी ‘एजंट विनोद’ या ऍक्शन थ्रिलरच्या रिलीजनंतरही सैफ अली खानशी लग्न करणार असल्याचा कुठलाही बेत नसल्याचं करीनाने आज जाहीर केलं. आगामी ‘एक मै और एक तू’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी करीना आपला सहकलाकार इम्रान खान आणि दिग्दर्शक शकुन बात्रा यांच्यासह नवी दिल्ली येथे आली होती. या प्रसंगी करीनाने हे स्पष्ट केले.

 

सध्या दोघांनाही लग्नाची घाई नसून आमचं सगळं लक्ष आमच्या करिअरवर असल्याचं ३१ वर्षीय करीनाचं म्हणणं आहे. ‘एजंट विनोद’ हा त्यांचा आगामी सिनेमा २३ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

“अजून तरी आमचा लग्नासंबंधी कोणताही प्लॅन नाही. आमचं सगळं लक्ष आमच्या येणाऱ्या सिनेमावर आणि आमच्या करिअर वर आहे.” असं करीना म्हणाली.  एजंट विनोद नंतर कुठलेही स्टंट्स आपण करणार नसल्याचंही करीनाने यावेळी सांगितलं.

 

“मी खूप रोमँटिक व्यक्ती आहे. मला मारधाड, गोळीबारवाले सिनेमा आवडत नाहीत. त्यामुळे एजंट विनोदमंतर मी अशा प्रकारचा कुठलाही ऍक्शन थ्रिलर सिनेमा करणार नाही. मला नाच-गाणी असलेले रोमँटिक सिनेमाच करायला आवडतात.” असं करीना म्हणाली.

 

First Published: Wednesday, February 8, 2012 - 16:11
comments powered by Disqus