इम्रान बेबोवर फिदा

Last Updated: Sunday, January 8, 2012 - 14:01

www.24taas.com, मुंबई 

 

इम्रान खान आणि करिना कपूरचा एक मै आणि एक तू लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. फेब्रुवारीत वँलेंटाईन डेच्या सुमारास हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकेल. इम्रान बेबो बरोबर काम करायाला मिळाल्यामुळए खुषीत आहे. बेबो ही इम्रानची स्वप्नपरी आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीपासूनच इम्रान बेबोवर तूफान फिदा होता.

 

इम्रान म्हणतो  रेफ्युजी या तिच्या पहिल्या सिनेमापासून तिच्या सौंदर्यावर मी घायाळ झालो होतो. मला माझ्या नेमक्या भावना व्यक्त करता आल्या नसल्या तरी मी तिच्या फिदा झालो होतो. आम्ही एकत्र काम करायला लागलो तेंव्हा आमच्यात चांगली मैत्री जुळली. एक मै और एक तू च्या शुटिंगच्या वेळेस आम्ही धमाला केली. मी तिच्या नकळत तिचे फोटो काढले. आणि ती इतकी सुंदर दिसते की फोटो काढणं हे अत्यंत स्वाभाविकच होतं. बेबो बरोबर काम करणं हा एक न विसरता येण्याजोगा अनुभव आहे इति इम्रान. एक मै और एक तू १० फेब्रुवारीला रिलीज होतं आहे. आता इम्रानला बेबोवर खरोखरच क्रश आहे नेहमीसारखाच सिनेमा प्रमोट करण्याचा फंडा हा यक्ष प्रश्न आहे.

 

 

 

First Published: Sunday, January 8, 2012 - 14:01
comments powered by Disqus