एजंट विनोदाचा गल्ला १० कोटी

Last Updated: Sunday, March 25, 2012 - 21:32

www.24taas.com, नवी दिल्ली

 
सैफ अली खानच्या होम प्रॉक्शनच्या एजंट विनोदने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आजवर सैफच्या सिनेमासाठीचे हे सर्वाधिक ओपनिंग आहे.

 

एजंट विनोदचा निर्मिती खर्च ५० कोटी रुपये असून मोरोक्को, रशिया आणि लॅटवियात चित्रीकरण करण्यात आलं आहे. सैफची अभिनेता म्हणून झालेली वाढ या सिनेमाच्या यशाने दिसून आल्याचं या क्षेत्रातील तज्ञ तरण आदर्श म्हणाले आहेत. तसंच पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सिनेमाला प्रेक्षकांची पसंती दर्शवतो असंही ते म्हणाले.

 

एजंट विनोदने केलेल्या तडाखेबंद व्यवसायाने सैफची गुणवत्ता आणि बॉक्स ऑफिसवर असलेला त्याचा करिष्मा यांचा दुर्मिळ मेळ असल्याचं तरण आदर्श म्हणाले आहेत. एजंट विनोदचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलेलं असून त्यात करिना कपूर, प्रेम चोप्रा आणि राम कपूर यांच्या भूमिका आहेत. इरोस इन्टरनॅशनलने या सिनेमाचे वितरण केलं आहे.

 

 First Published: Sunday, March 25, 2012 - 21:32


comments powered by Disqus