का झाला 'धरम' गरम...

Last Updated: Tuesday, July 3, 2012 - 18:38

www.24taas.com, मुंबई   

 

हेमामालिनी आणि धर्मेद्र यांची मुलगी ईशा देओल हिचं लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नासाठी सगळ्यांनाच ईशाचे दोन्ही भाऊ बॉबी आणि सनी यांची अनुपस्थिती जाणवली. हाच प्रश्न काही पत्रकारांनी धर्मेंद्रला विचारला तेव्हा जाणवलं की ‘ऑल इज नॉट वेल’.

 

ईशा आणि भरतच्या लग्नाचा सोहळा तब्बल 4 दिवस मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. अवघं बॉलिवूड या सोहळ्यासाठी उपस्थित होतं. पण, सगळ्यांनाच खलत होती ती बॉबी देओल आणि सनी देओल या ईशाच्या सावत्र भावांची. धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची मुलं सनी आणि बॉबी हे आपापल्या व्यस्त शेड्युलमुळे लग्नाला येऊ शकले नव्हते, असं अगोदर सांगण्यात आलं होतं. पण, हाच प्रश्न जेव्हा काही पत्रकारांनी धर्मेंद्र यांना विचारला, तेव्हा मात्र धर्मेंद्र भयंकर चिडला.

 

ईशाच्या रिसेप्शनसाठी सगळे जमले असताना काही पत्रकारांनी बॉबी आणि सनीचा विषय काढताच अभिनेता धर्मेंद्रनं या रिपोर्टरची टर उडवली आणि प्रश्नाचं उत्तर न देताच बाजूला निघून गेला. थोड्यावेळानं आणखी एका पत्रकारानं हाच विषय काढताच धर्मेद्रनं ‘आप बकवास मत करो’ या शब्दात त्याला चांगलाच दम भरला.

 

मी सध्या खूप खूश आहे. तुम्ही पण खूश राहा आणि चांगले प्रश्न विचारा असं म्हणत थोड्यावेळानं धर्मेंद्र पुन्हा आपल्या मूडमध्ये आला. पण, धर्मेंद्रचा चिडलेला चेहरा बघून हे न सांगताही जाणवत होतं की, काहीतरी बिनसलंय.

 

 

First Published: Tuesday, July 3, 2012 - 18:38
comments powered by Disqus