पुन्हा एकदा जुडवा पण सलमानविना...

सलमान खानच्या कॉमेडी इनिंगला सुरुवात झाली ती जुडवा सिनेमानं.... या सिनेमात सलमानचा डबल रोल पहायला मिळाला...रंभा आणि करिष्मा कपूरसह त्यांनं केलेला रोमान्स आणि या सिनेमातली एकाहून एक गाजलेली गाणी हा सिनेमाचा युएसपी होता.

Updated: Dec 9, 2011, 02:21 PM IST

झी २४ तास वेब टीम

 

सलमान खानच्या कॉमेडी इनिंगला सुरुवात झाली ती जुडवा सिनेमानं.... या सिनेमात सलमानचा डबल रोल पहायला मिळाला...रंभा आणि करिष्मा कपूरसह त्यांनं केलेला रोमान्स आणि या सिनेमातली एकाहून एक गाजलेली गाणी हा सिनेमाचा युएसपी होता.. सध्या बॉलिवूडमध्ये आलेल्या सिक्वलच्या लाटेत जुडवाचाही सिक्वल येणार अशी चर्चा होती.

 

डेव्हिड धवन सलमानला घेऊन पुन्हा एकदा ताटातूट झालेल्या दोन जुळ्या भावांची विनोदी कथा घेऊन येण्यास सज्ज झाले होते. मात्र आता कहानी में नेहमी प्रमाणे ट्विस्ट आहे. आणि हा ट्विस्ट असा आहे की जुडवा सिनेमाचा आत्मा आसलेल्या सलमान खाननंच जुडवाच्या सिक्वलमधून काढता पाय़ घेतला.

 

तारखा उपलब्ध नसल्यानं सलमाननं हा सिक्वलमध्ये काम करणार नसल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर डेव्हिड धवन कडून आता दिग्दर्शनाची सूत्र साजिद खानकडे आलीत त्यामुळेच तर सलमाननं या सिनेमातून काढता पाय घेतला नसेल ना अशीही शंका व्यक्त होते. हं आता खरा गोप्य स्फोट तरपुढेच आहे कारण सलमान ऐवजी जुडवाच्या भूमिकेत दिसणारे सैफ अली खान. आता सैफनं रंगवलेला जुडवा प्रेक्षकांच्या मनात घर करेल का हा प्रश्नच आहे....