बालतुकाराम....

Last Updated: Thursday, March 22, 2012 - 12:23

www.24taas.com,

 

तुकारामांची मधुर वाणी पद्मनाभ गायकवाडच्या मुखातूनही आपल्याला ऐकायला मिळणारे आहे. कारण या सिनेमात पद्मनाभने गायनासह आपल्या अभिनयाचीही चुणूक दाखवली आहे.

 

छोटा गायक सर्वांचा लाडका पद्मनाभ गायकवाड आता अभिनेताही झाला आहे. छोट्या पद्मनाभने आगामी तुकाराम सिनेमामध्ये बालतुकारामांची भूमिका केली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. त्यामुळे छोट्या पद्मनाभला या सिनेमाकडून खूपच अपेक्षा आहेत.

 

१२ वर्षांच्या पद्मनाभने या सिनेमामध्ये एक गाणही गायलं आहे. जे गाणं त्याच्यावरच चित्रीत करण्यात आलं आहे. पद्मनाभला गायन क्षेत्रात चांगली गाणी गाण्याची संधी तर मिळतेच आहे आणि आता त्याला मिळालेल्या अभिनयाच्या संधीचही तो सोनं करतो का हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

 

 First Published: Thursday, March 22, 2012 - 12:23


comments powered by Disqus