मैत्रीचा 'फिल्मी फंडा'

दोस्ती, मेरे हमदम मेरे दोस्तपासुन ते शोले, दिल चाहता है, थ्री इडियट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारापर्यंत चित्रपटांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या चित्रपटांत वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेली ‘मैत्री’ प्रेक्षकांनी सहजगत्या स्वीकारली. थोडक्यात काय तर, चित्रपटांतूनही आपल्याला मैत्रीचं नातं अनुभवायला मिळालं.

Updated: Aug 5, 2012, 05:29 PM IST

www.24taas.com, मुंबई 

‘मैत्री’ ही सर्वांच्याच जीवनातील एक अविभाज्य नातं आहे. जगातील असा एकही व्यक्ती नसेल की त्याला मित्र नाही. याच नात्यावर आधारीत अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट झालेत. दोस्ती, मेरे हमदम मेरे दोस्तपासुन ते शोले, दिल चाहता है, थ्री इडियट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारापर्यंत चित्रपटांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या चित्रपटांत वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेली ‘मैत्री’ प्रेक्षकांनी सहजगत्या स्वीकारली. थोडक्यात काय तर, चित्रपटांतूनही आपल्याला मैत्रीचं नातं अनुभवायला मिळालं.

 

जगातील बऱ्याचशा देशात ५ ऑगस्ट हा दिवस ‘फ्रेंडशिप डे’ मानला जातो. अनेक चित्रपटांमध्ये या नात्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे. ७० आणि ८०च्या दशकात अमिताभच्या शोले, याराना, नमक हराम, दोस्ताना, नसीब या चित्रपटांना लोकांनी डोक्यावर घेतलं. या सर्व चित्रपटांमध्ये एकसारखाच मसाला होता परंतू प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या प्रकारे मैत्री अधोरेखित केलेली दिसली. चित्रपट समीक्षक राशिद कुरैशी म्हणतात, मैत्रीवर अधारीत चित्रपट लोकांना पाहायाला आवडतात, कारण प्रत्येकालाच मित्र असतात आणि चित्रपटातील त्या भूमिकेत ते स्वत:ला पाहातात. ‘मैत्री’ या शब्दाशी ओळख नसलेला व्यक्ती दुर्मिळच... म्हणून मैत्रीवर अधारीत चित्रपट लोकांना पाहायला जास्त आवडतात.

 

चित्रपट इतिहासकार एस. एम. औसजा यांच्या मते, भारतीय माणूस लहानपणापासूनच नाती-गोती जपत आलेला असतो. परंतू रक्ताच्या नात्याला बाजूला सारुन मैत्रीचं नातं जास्त जपलं जातं. अनेक हिंदी चित्रपटांची कथांमध्ये मित्रासाठी जीव देऊन मैत्रीचं नातं जपण्याची शिकवणूक दिलेली आपल्याला पाहायला मिळेल. अशा अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनीही चांगलीच दाद मिळालेली आहे. चित्रपट समीक्षक राजकमल यांच्या मते,  अनेक जण स्वत:ला चित्रपटातील कथेशी जोडत आसतात त्यामुळेच त्या कथेशी ते एकरुप होतात. सन १९६४ मध्ये ‘दोस्ती’ या चित्रपटात एका अंध आणि अपंग असलेल्या मित्रांची कहानी मांडली होती. ती कहानीही लोकांना चांगलीच भावली होती. त्याचवर्षी राजकपूरचा ‘संगम’ हा चित्रपट आला होता. त्यामध्येही राज कपूर आणि राजेंद्र कुमार यांची मैत्री दाखवली होती.

 

औसजा म्हणतात, ‘लोकांना मैत्रीवरती जास्त चित्रपट पाहायला आवडतात. ‘मुन्नाभाई एमबीबीएस‘मध्ये मुन्ना आणि सर्किट यांची अनोखी मैत्री लोकांना पाहायला मिळाली. तर निर्माता फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता है’ हा चित्रपट सुपरहिट होण्यामागचं कारणही ‘मैत्री’ हीच होती. ‘पार्टनर’मध्ये गोविंदा आणि सलमान खान यांची रोमांटिक कॉमेडीतही त्यांची मैत्री आपल्याला पाहायाला मिळते. राजकमल यांच्या म्हणण्यानुसार ‘पिढीनुसार चित्रपटांचे दर्शक बदलत असतात. बदलत्या पिढीनुसार बदललेले चित्रपट लोकांना आवडतात’.

 

.