रणबीरची काय बाबा मजा आहे.....

Last Updated: Monday, March 26, 2012 - 23:25

www.24taas.com, मुंबई   

 

रणबीर कपूरने कपूर घराण्याचा वारसा अभिनय आणि एकाच वेळा अनेकांशी प्रेमलीलांच्या बाबतीतबी तितक्याच दमदारपणे पुढे चालवला आहे. रणबीरने आपण सर्वाथाने लायक वारसदार आहोत हे सप्रमाण सिद्ध केलं आहे.

 

रॉकस्टारच्या यशाने रणबीरचं करिअर आसमाँ की बुलंदी पे पोहचलं आहेच. त्याचवेळेस त्याची एकेकाळची प्रेमीका दीपीका पदुकोणशी परत एकदा ऋणानुबंध जुळल्याची चर्चा सुरु असतानाच आता त्याच्या लव्ह लाईफमध्ये अनुष्का शर्मानेही एण्ट्री घेतली असल्याची बातमी आहे. आणि हे तर काहीच नाही रणबीरने आगामी एका प्रोजेक्टसाठी अनुष्काचं नाव सूचवलं आहे.

 

सध्या रणबीर अनुराग कश्यपच्या बॉम्बे वेलवेटमध्ये व्यस्त आहे. रणबीरने कश्यपचा आगामी प्रोजेक्ट साईन केला आहे आणि त्याने दीपीका ऐवजी अनुष्काचे नाव सूचवल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रणबीर आणि अनुष्कात सूत जुळल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. रणबीर हा इंडियन कॅसानोवा आहे हे मात्र खरं आहे.First Published: Monday, March 26, 2012 - 23:25


comments powered by Disqus