सैफच्या मागावर पोलीस

Last Updated: Wednesday, February 22, 2012 - 16:19

www.24taas.com, मुंबई

 

अभिनेता सैफ अली खान विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आता कोणत्याही क्षणी सैफ अली खानला अटक होऊ शकते. इक्बाल शर्मा याला मारहाण केल्याचा सैफ अली खानवर आरोप आहे. इक्बाल शर्मा हा व्यावसायिक आहे. त्याला सैफनं वासवी रेस्टॉरंटमध्ये मारहाण केल्याचा आरोप आहे.

 

सैफ अली खान याने ताज हॉटेल मधील वासवी रेस्टॉरंटमध्ये इक्बाल शर्मा याला मारहाण केली होती.  सैफ अली खान आणि त्याचे मित्र रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी सैफ अली खान आणि मित्रांनी मोठमोठ्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यावर शेजारच्या टेबलवर असलेल्या इक्बाल शर्मा यांनी सैफ यांना आवाज कमी करण्याची विनंती केली . परंतु, त्यानंतर झालेल्या बाचाबाजी होऊन मारहाण झाली. या मारहाणीत इक्बाल शर्मा यांच्या नाकाला इजा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  ही मारहाण झाली तेव्हा सैफ अली खान सोबत बेबो म्हणजेच करीना कपूर देखील हजर होती. सैफ अली खान यांच्याविरोधात इक्बाल यांनी तक्रार नोंदवली. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला आहे.

 

तसचं सुत्रांकडून समजते की, पोलिसांनी ही तक्रार ३२५ या कलमा अतंर्गत नोंदवल्यामुळे सैफ अली खानला अटक देखील होण्याची शक्यता आहे. तसचं खात्रीलायक सुत्रांकडून असेही समजते आहे की, पोलिसांची एक टीम सैफ अलीची चौकशी करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी दाखल झाली मात्र त्यावेळी सैफ अली खान उपस्थित नव्हता. या ठिकाणी करीना कपूर उपस्थित होती.  आता पोलीस सैफच्या मागावर आहेत.  ३२५ हे  कलम अजामीनपात्र असल्याने सैफला अटक केली जाऊ शकते.

 

 

First Published: Wednesday, February 22, 2012 - 16:19
comments powered by Disqus