सैफ-बेबोचा साखरपुडा लवकरच

Last Updated: Thursday, February 2, 2012 - 12:19

www.24taas.com, मुंबई

 

करिना कपूरने जरी सैफ अली खानशी नजीकच्या काळात होणाऱ्या विवाहा संबंधी वृत्ताचा इन्कार केला असला तरी येत्या १० फेब्रुवारी रोजी त्यांचा साखरपुडा होणार असल्याच्या अफवांनी जोर धरला आहे. सैफच्या एजंट विनोदच्या मार्चमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हे दोघे विवाह करणार असल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं. पण आता या हॉट जोडीला लवकर विवाह बंधनात अडकायचं असल्याने फेब्रुवारी महिन्यात दहा तारखेला ते साखरपुडा करणार असल्याचं वृत्त आहे.

 

सैफ आणि बेबो गेली काही वर्षे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत आणि त्यामुळेच आता त्यांना त्याचं रुपांतर नात्यात व्हावं असं वाटत आहे. त्यामुळेच त्यादृष्टीने पहिलं पाऊल ते १० फेब्रुवारी रोजी साखरपुडयाच्या रुपाने उचलणार आहेत. सध्या एजंट विनोदच्या निर्मितीत सैफ व्यस्त आहे,  तर करिना एक मै और एक तूच्या प्रमोशनसाठी दौऱयावर आहे. नुकताच करिनाने ४० लाख रुपयांचा नेकलेस विकत घेतला होता, त्यामुळेच लवकरच त्यांचा साखरपुडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

आता हा समारंभ मुंबईत होणार की सैफच्या दिल्ली निवासस्थानी हे अद्याप निश्चित झालेलं नाही. बेबो सध्या करिष्मा सोबत लंडनमध्ये आहे. या सोहळ्यासाठी बेबो विक्रम फडणीसने डिझाईन केलेला खास ड्रेस परिधान करणार आहे. आता रितेश-जेनेलियाच्या शुभविवाह पाठोपाठ सैफ-करिनाही लवकरच विवाहबंधनात अडकतील अशी चिन्हं दिसत आहेत.

 

 First Published: Thursday, February 2, 2012 - 12:19


comments powered by Disqus