'गुंतता हृदय हे'चा गुंता लवकरच सुटणार!

संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी यांचं 'अवंतिका' नंतर बऱ्याच वर्षांनी एकत्र येणं, सतीश राजवाडेचं दिग्दर्शन आणि चिन्मय मांडलेकरचे धारदार संवाद या स्रावंमुळे गुंतता हृदय मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच गुंतवलं आहे. पण, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Updated: Dec 14, 2011, 11:18 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी यांचं 'अवंतिका' नंतर बऱ्याच वर्षांनी एकत्र येणं, सतीश राजवाडेचं दिग्दर्शन आणि चिन्मय मांडलेकरचे धारदार संवाद या स्रावंमुळे गुंतता हृदय मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच गुंतवलं आहे. पण, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘गुंतता हृदय हे…’ मधील सस्पेन्स, थ्रीलर मालिकेतलं गूढ हळुहळू उकलायला लागलंय. आणि त्यामुळे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. देवीचं किडनॅपिंग नक्की कोणी केलं होतं या प्रश्नाचं उत्तर अखेर प्रेक्षकांना मिळालंय.

कॅप्टन आणि अभय सामंतचा हा डाव असल्याचं समोर आलेलं असलं तरी अजूनही काही प्रश्नांची उत्तर अनुत्तरीत्तच आहेत. विक्रमच्या हातून खरंच अनन्याचा खून झालाय का? या सगळ्यामागे खरंच कॅप्टनचाच हात आहे का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे सध्या तरी मालिका पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close