'बिग बॉस'चा 'निकाल' थोड्याच वेळात !

९८ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आता थोड्याच वेळात बिग बॉस सीझन-५चा विजेता जाहीर होईल. बिग बॉसच्या घरात १५ प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड देत जे पाच फायनलिस्ट उरले आहेत. त्यांच्यातला एक विजेता अथवा विजेती ठरेल.

Updated: Jan 7, 2012, 08:38 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

९८ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आता थोड्याच वेळात बिग बॉस सीझन-५चा विजेता जाहीर होईल. बिग बॉसच्या घरात १५ प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड देत जे पाच फायनलिस्ट उरले आहेत. त्यांच्यातला एक विजेता  अथवा विजेती ठरेल. जुही परमार, महक चहल, सिद्धार्थ भारद्वाज, अमर उपाध्याय आणि स्काय यांपैकी कोण विजेता ठरेल याची उत्कंठा घरातल्या लोकांबरोबरच बिग बॉसच्या घराबाहेरील लोकांनाही आहे.

 

बिग बॉस-५ च्या विजेत्याला १ कोटी रुपये दिले जातील. आज होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूडचे स्टार्सही आपल्या अदा दाखवणार आहेत. मलायका आरोरा ‘मुन्नी बदनाम’, ‘छैया छैया’, ‘होट रसिले’वर ठुमके लगावणार आहे, तर करण जोहर आणि इम्रान खान आपल्या आगामी ‘एक मै और एक तू’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत.

 

या शोमधून बाहेर पडलेले शक्ती कपूर आणि सनी लियॉन हे स्पर्धकदेखील आपली अदाकारी पेश करतील. शक्ती कपूर सुंदर मुलींबरोबर डांस करणार आहे, तर सनी ‘साड्डी गली’, ‘जुगनी’ या गाण्यांवर नृत्य करणार आहे. पूजा मिश्रा मिक्स डांस करणार आहे.

 

बिग बॉसच्या यापूर्वीच्या सीझनमधल्या राखी सावंत, डॉली बिंद्रा या फायनलमध्ये आपले अनुभव सांगतील. मात्र,  पूजा बेदीला ग्रँड फिनालेमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.