सिंधुदुर्गात ८० मतदान केंद्र संवेदनशील

Last Updated: Wednesday, January 18, 2012 - 16:46

www.24taas.com, ओरोस

 

सिंधुदुर्गात १०४६ पैकी एकूण ८० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी  सर्वाधिक ३३  मतदान केंद्रे कुडाळ तालुक्‍यात आहेत.

 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ७ फेब्रुवारीला होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांचा अहवाल निवडणूक विभागाने पोलीस विभागाकडून मागितला होता. तो नुकताच सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात अतिसंवेदनशील मतदान केंद्र नसल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाने दिला आहे.  मात्र, यात वैभववाडीत एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे म्हटले आहे.

 

तालुकानिहाय संवेदनशील मतदान केंद्र

दोडामार्ग-

शाळा साटेली-भेडशी पूर्व भाग, साटेली-भेडशी पश्‍चिम भाग, न्यू इंग्लिश स्कूल भेडशी, शाळा दोडामार्ग क्रमांक २, बापूसाहेब देसाई विद्यालय उसप, उसप केंद्रशाळा.

 

सावंतवाडी-

कोलगाव क्रमांक ३, ग्रामपंचायत कार्यालय कोलगाव, कोलगाव क्रमांक २, शाळा कोलगाव क्रमांक १, शाळा मेटवाडी, तळवडे क्रमांक ३, शारदा विद्यालय तळवडे, शाळा तळवडे क्रमांक १, शाळा तळवडे क्रमांक ६, शाळा तळवडे क्रमांक ९.

 

कुडाळ-

आंब्रड-परबवाडा, आंब्रड-बाजारवाडी, श्री देवी भगवती माध्यमिक विद्यालय आंब्रड, भडगाव बुद्रुक शाळा, कुडाळ कन्याशाळा, कुडाळ शाळा क्रमांक १, नेरूर तर्फ हवेली सेंट्रल स्कूल कन्याशाळा, पिंगुळी क्रमांक १, गोठोस क्रमांक १, वेताळबांबर्डे-गडकरवाडी, बांबर्डे तर्फ कळसुली देऊळवाडी, बांबर्डे तर्फ कळसुली-कदमवाडी, वाडोस केंद्रशाळा, शाळा सेंट जोसेफ माणगाव, शाळा कट्टावाडी क्रमांक १, माणगाव क्रमांक २, डॉ. आंबेडकर विद्यालय माणगाव पूर्वभाग, माणगाव क्रमांक ३ ढोलकरवाडी, आकेरी-हुमरस, तेर्सेबांबर्डे शाळा.

 

मालवण-

कुणकवळे शाळा, प्राथमिक शिक्षण मंडळ प्रायमरी शाळा सुकळवाड, शाळा सारंगवाडी नांदोस, शाळा देवबाग क्रमांक २, वायरी-भूतनाथ, जीवन शिक्षण विद्यालय चौके, आंबेरी क्रमांक १, शाळा भंडारवाडा वराड, शाळा कट्टा क्रमांक १.

 

देवगड-

शिरगाव हायस्कूल, शिरगाव शाळा क्रमांक १.

 

कणकवली- 

जीवन शिक्षण विद्यामंदिर फोंडाघाट क्रमांक १, भिरवंडे जांभुळ भाटले, हरकुळ बुद्रुक शाळा क्रमांक १, शाळा कळसुली, भोगनाथ विद्यामंदिर कळसुली क्रमांक ३, शिवडाव-गावकरवाडी.First Published: Wednesday, January 18, 2012 - 16:46


comments powered by Disqus