Zeenews logo
English   
Thursday, May 23, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

अण्णा 'टीम अण्णा'वर नाराज?

www.24taas.com, नवी दिल्ली
टीम अण्णा बरखास्त करण्यात आलीय. अण्णांनी ब्लॉगवर याची घोषणाही केली. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. सर्वात मोठा प्रश्न आहे, की अण्णा टीमवर नाराज आहेत का?
 
लोकपाल बिलासाठी संपूर्ण देशभरात आंदोलन उभं करणारे अण्णा हजारे आपल्याही टीमवर नाराज आहेत का? ब्लागवर लिहिलेल्या अण्णांच्या लेखाने हा प्रश्न उपस्थित झालाय. अण्णांनी ब्लॉगवर टीम अण्णा बरखास्त करण्याची घोषणा केलीय. आता अण्णांच्या ब्लॉगला समजून घेण्याची आणि त्याचे अर्थ काढण्यासाठी प्रयत्न सुरु झालेत. तसचं राजकीय पर्यायासाठी टीम अण्णातील सहा सदस्य आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव अशी सात जणांची कमिटी स्थापन करण्यात येत असल्याचीही चर्चा आहे. याबाबत अण्णांकडे विचारणा केली असता, त्यांनी मात्र याला नकार दिलाय.
 
अण्णांनी दिलेल्या या नकाराचा अर्थ काय? अण्णा आपल्या टीमवर नाराज आहेत का? जुन्या टीम अण्णाचे सदस्य असलेले माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे यांच्या वक्तव्यानंही टीम अण्णातील फूट उघड झाली होती. राजकारणात सक्रिय होण्यावरुन टीम अण्णात मतभेद असल्याचंही स्पष्ट झालं होतं.
 
अण्णा आंदोलनानंतर राळेगणला रवाना झाले असले, तरी त्यांनी दिल्लीतून जाण्यापूर्वी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अण्णा खरचं टीमवर नाराज आहेत का? नऊ ऑगस्टपासून बाबा रामदेवांच्या आंदोलनात अण्णा सहभागी होणार का? प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत.
 

First Published: Tuesday, August 07, 2012, 00:14

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: