अनुराधा बाली ऊर्फ फिजाचा संशयास्पद मृत्यू

Last Updated: Monday, August 6, 2012 - 14:01

www.24taas.com, मोहाली 

वादग्रस्त अनुराधा बाली ऊर्फ फिजाचा मोहालीच्या राहत्या घरी दुर्दैवी अंत झालाय. फिजाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आलाय. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. त्यामुळं तिनं आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. फिजाच्या घराचे लॅच तोडलेले असल्याचं तिच्या काकांनी सांगितलंय. त्यामुळं फिजानं आत्महत्या केली की तिचा खून झाला याबाबत तर्कवितर्कांना ऊत आलाय. मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.

 

कोण होती ही फिजा

* अनुराधा बाली ही खरी चर्चेत आली ती  चंद्रमोहन यांच्याशी दुसरं लग्न केल्यानं...

* फिजा ही हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन यांची दुसरी पत्नी होती.

* चंद्रमोहन आणि अनुराधा बाली यांनी  दुसरं लग्न करण्यासाठी दोघांनी धर्मांतरही केलं होतं.  त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

* विवाहानंतर चंद्रमोहन बनले होते चाँद मोहम्मद तर अनुराधा बनली होती फिजा...

* पण, हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर केवळ काही महिन्यांतच चंद्रमोहन यांनी फिजाला घटस्फोटही दिला होता.

* लग्नाआधी अनुराधा बाली हिनं चंदीगढच्या महाधिवक्त्याचं पदही भूषवलं होतं.

 

.

First Published: Monday, August 6, 2012 - 14:01
comments powered by Disqus