आजचा सेंसेक्स

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 151 अंशांवर बंद झाला. त्यात दीडशे अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 5 हजार 188 अंशांवर बंद झाला. त्यात 50 अंशांची घट झाली.

Updated: May 3, 2012, 06:18 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 151 अंशांवर बंद झाला. त्यात दीडशे अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 5 हजार 188 अंशांवर बंद झाला. त्यात 50 अंशांची घट झाली.

 

अशक्त एशियन स्टॉक्समुळे आज सकाळी बाजार तुलनेनं खालच्या पातळीवर खुला झाला. त्यानंतर सकाळच्या आणि  दुपारच्या सुरूवातीच्या सत्रात बाजारात घसरणच पहायला मिळाली. दुपारी बाजार काहीसा सावरला. पण शेवटी बाजार घटीच्या पातळीवरच बंद झाला. तिमाही महसुलात वाढ झाल्यामुळे प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपनी हिंदूस्थान युनिलिव्हरनं  आज उच्चांक नोंदवला. एशियन पेंट्सनेही उच्चांक नोंदवला.

 

कच्च्या मालाच्या किंमती वाढून नफ्यात घट झाल्यामुळे हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स आज घसरले होते. लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये मेटलच्या किंमती कमी झाल्यामुळे मेटल स्टॉक्स घटले होते. बॅका आणि एटो स्टॉकमध्ये आज घसरण पहायला मिळाली. एसीसी आणि अंबुजाच्या मर्यादित नफ्यामुळे सिमेंट स्टॉक्स घटले होते. हवाई वाहतूक कंपन्यांचे आज शेअर्समध्ये घट झाली होती. आपत्कालीन निधीत वाढ करण्यासाठी रिझर्व्ह बॅकेनं मार्गदर्शक नियम जाहीर केल्यामुळे बॅंकांचे स्टॉक्समध्ये घसरण होती.

 

आज हिंदूस्थान युनिलिव्हर, विप्रो, टीसीएस, भेल, इन्फोसिस या टॉप फाईव्ह कंपन्या तेजीत होत्या तर हिरो मोटोकॉर्प, मारूती सुझुकी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बॅंक आणि एसबीआय या टॉप फाईव्ह कंपन्या मंदीत होत्या.