आज सचिन खासदार होणार... - Marathi News 24taas.com

आज सचिन खासदार होणार...

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोमवारी आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. सचिन राज्यपालांच्या कक्षेमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या उपस्थितीत  शपथ घेणार आहे.
 
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता खासदार सचिन तेंडुलकर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सचिन खासदारकीची शपथ कधी घेणार याबाबत अनेक शक्याशक्यता वर्तवल्या जात होत्या.
 
सचिनबरोबरच राज्यसभेत निवड झालेल्या अभिनेत्री रेखानं १६ मे ला राज्यसभेची शपथ घेतली होती. आता सचिन आपली राज्यसभेची नवी इनिंग कशी खेळतो याक़डेच त्याच्या चाहत्यांच लक्ष असणार आहे.
 
 
 
 
 
 

First Published: Monday, June 04, 2012, 15:09


comments powered by Disqus