...आणि सोनिया गांधी भडकल्या

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संतापाचा पारा आज लोकसभेत पाहायला मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी अडवाणी यांनी 'यूपीए -2 सरकार अवैध' असल्याचे म्हटले आणि शांत वाटणाऱ्या सोनिया गांधी यांनी आपला वृद्रावतार दाखवला. काँग्रेसने प्रती हल्लाबोल केल्यानंतर अडवाणी यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.

Updated: Aug 9, 2012, 01:48 AM IST

www.24taas.com , नवी दिल्ली

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संतापाचा पारा आज लोकसभेत पाहायला मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी अडवाणी यांनी  'यूपीए -2 सरकार अवैध'  असल्याचे म्हटले आणि शांत वाटणाऱ्या सोनिया गांधी यांनी आपला वृद्रावतार दाखवला. काँग्रेसने प्रती हल्लाबोल केल्यानंतर अडवाणी यांनी आपले वक्तव्य मागे घेतले.

सरकारवर गंभीर आरोप करत असतानाच 'यूपीए -2 सरकार अवैध' असल्याचं वक्तव्य लालकृष्ण अडवाणी यांनी केलं. अडवाणींच्या या वक्तव्यावरून सभागृहात एकच हलकल्लोळ माजला. यावर क्वचितच संतापणाऱ्या सोनिया गांधीही प्रचंड संतापल्या. यानंतर मात्र अडवाणींनी आपण 'यूपीए-1' वर बोलत होतो. चुकून यूपीए - 2 म्हणालो,  असं म्हणत आपलं वक्तव्य मागे घेतलं.

आसाममधील हिंसाचार, अमरनाथ यात्रेदरम्यान घडलेल्या घटना आणि अमेरिकेतील गुरुद्वारामध्ये झालेला गोळीबार या सर्व विषय विरोधकांनी मांडल्याने गोंधळ उडून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर कामाजाला सुरूवात होताच अडवाणी अधिकच आक्रमक झाले. त्यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही. या टीकेच्या भरात सरकारच अवैध म्हटल्याने लोकसभेचे वातावरण कमालीचे तापले आणि जोरदार गोंधळाला सुरूवात झाली. त्यात सोनिया गांधीही अधिकच आक्रमक झाल्याने लोकसभेत रणकंदन पाहायला मिळाले.

पावसाळी अधिवेशनाअंतर्गत पहिल्या सत्राचे कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी देशातील सर्व ज्वलंत विषयांना हात घातला. तसेच, या विषयावर ताबडतोबीने चर्चा व्हावी, अशी मागणी केली. क्रमाक्रमाने एकएक विषयावर चर्चा करू असे सरकारकडून सांगण्यात येत असतानाही विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने कामकाजात व्यत्यय आला.