उमा भारती निवडणूक रिंगणात

Last Updated: Thursday, January 19, 2012 - 12:07

www.24taas.com,  नवी दिल्ली

 

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक रिंगणात आता उमा भारती भाजपकडून निवडणूक लढविणार आहेत. बुदेलखंड जिल्ह्यातील चारखारी येथून उमा भारती निवडणूक लढविणार आहेत.

 

उमा भारती यांच्याकडे भाजपचा प्रभार आहे.  उमा भारती या भाजपच्या स्टार प्रचारक असल्याचे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. निवडणूक लढविण्यासंबंधी प्रथम उमा भारतींशी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशात उमा भारतींसह माजी मुख्यमंत्री राजनाथ सिंह, वरिष्ठ नेते कालराज मिश्रा आणि सूर्य प्रताप साही हे प्रमुख प्रचारक असणार आहेत, ्असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

 

उत्तर प्रदेशमध्ये विकास करण्यासाठी भाजप याठिकाणी सत्तेत येणे आवश्यक आहे, असे उमा भारती यांनी सांगितले. मागासवर्गीयांचा विकास हाच भाजपचा मुख्य अजेंडा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ४८ जागा मिळविल्या होत्या. त्यामुळे उमा भारती यांचा पक्षाला किली फायदा होतो, याकडे लक्ष लागले आहे.

 First Published: Thursday, January 19, 2012 - 12:07


comments powered by Disqus