गेले जोशी, मोदींची सरशी...

Last Updated: Friday, June 8, 2012 - 16:11

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भाजपमधील सत्तासंघर्ष हातघाईला आला आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस संजय जोशी यांनी भाजपला जय श्रीराम केला आहे.  भाजप नेते संजय जोशींनी पक्षाचा राजीनामा दिला होता.

 

भाजप पक्ष सदस्य़त्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षकार्यातून मुक्त करण्याची केली होती. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर भाजपकडून अध्यक्ष नितीन गडकरी राजीनामा मंजूर केल्याचे वृत्त पीटीआयने प्रसिद्ध केले.

 

मोदी वादानंतर संजय जोशींचा राजीनामा हा मान्य करण्यात आला आहे. मोदींनी दबाबतंत्राचा वापर करून संजय जोशींना साईड लाईन केलं.  मोदींच्या दबावानंतर जोशींचा राजीनामा हा मान्य करण्यात आला. राजीनाम्यानंतर गुजरातमध्ये पोस्टरवॉर देखील पाहायला मिळालं.

 

 

 

First Published: Friday, June 8, 2012 - 16:11
comments powered by Disqus