दिनेश त्रिवेदींचा राजीनामा नाही

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावरून तृणमूल आणि दिनेश त्रिवेदींमध्ये वाद पेटू लागला आहे. त्रिवेदींनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती समोर आली आहे तर त्रिवेदींनी आता पक्षातच राहू नये, अशी तिखट प्रतिक्रिया सुदीप बंदोपाध्याय यांनी दिली आहे.

Updated: Mar 15, 2012, 05:13 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावरून तृणमूल आणि दिनेश त्रिवेदींमध्ये वाद पेटू लागला आहे. त्रिवेदींनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती समोर आली आहे तर त्रिवेदींनी आता पक्षातच राहू नये, अशी तिखट प्रतिक्रिया सुदीप बंदोपाध्याय यांनी दिली आहे.

 

 

रेल्वे बजेटमध्ये प्रवासी भाड्यात वाढ केल्याने त्रिवेदींना ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास सांगितले. त्यामुळं संसदेत आज त्रिवेदी हजर राहणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे. मात्र, त्रिवेदींनी राजीनामाच दिला नसल्याची माहिती समोर येत असल्यानं आज ते संसदेत हजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान,  रेल्वे भाडेवाढीवरुन संतप्त झालेल्या ममता बॅनर्जींनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी त्रिवेदी यांना हटवण्याची मागणी केली होती.

 

 

रेल्वे भाडेवाढीला तृणमूल काँग्रेसनं विरोध केल्यानं सरकारपुढं पेच निर्माण झाला आहे.तर रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी सादर केलेल्या पहिल्याच बजेटमध्ये त्यांनी प्रवाशांना भाडेवाढीचा धक्का दिला आहे. दरम्यान, त्रिवेदींना पक्षाने बाजूला होण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्रिवेदींनी राजीनामा दिला आहे की नाही, याबाबत अधिकृत घोषणा तृणमूल पक्षाकडून करण्यात आलेली नाही. मात्र, पक्ष केंद्रातील आघाडी सरकारला पाठिंबा कायम ठेवणार आहे. त्यामुळे युपीए सकारची होणारी डोकेदुखी दूर झाली आहे.

 

 

आम्ही भाडेवाढीविरोधात कायम आहोत. गरिबांवर भाडेवाढीचा बोजा टाकणार नाही, अशी तृणमूल पक्षाची भूमिका असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.  दरम्यान, ममता बॅर्नजी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितला तर आपण राजीना देऊ अशी भूमिका त्रिवेदींनी घेतली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला की नाही, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नव्हती. मात्र, आपण राजीनामा दिलेला नसल्याचे त्रिवेदी यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.