नेमकं काय हवंय शरद पवारांना...

Last Updated: Friday, July 20, 2012 - 21:29

www.24taas.com, नवी दिल्ली

 

आपली नाराजी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आलीय. या पत्रातून शरद पवार यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या तीन मागण्याही मांडल्यात. यातलीच एक मागणी आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कार्यशैलीत बदल घडवण्याच्या सूचना करणं.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळीच काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची १० जनपथवर जाऊन भेट घेतली. प्रणव मुखर्जी यांनी अर्थखात्याचा राजीनामा दिल्यानंतरची मंत्रिमंडळातली बदललेली समीकरणं आणि त्यानुसार आपली भूमिका निश्चित करण्यासाठी पवारांनी सोनियांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, पवारांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आपल्या तीन प्रमुख मागण्यांचा उल्लेख केलाय. यातली पहिली मागणी आहे, तारिक अन्वर यांना राज्यसभेचं उपसभापतीपद बहाल करणं, दुसरी मागणी आहे राष्ट्रवादीचे नेते जनार्दन वाघमारे यांना राज्यपाल पदी विराजमान करणं तर तिसऱ्या मागणीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या कार्यशैलीत बदल करण्याची सूचना करण्याचे आदेश देणं... अशा तीन मागण्या पत्राद्वारे शरद पवारांनी पंतप्रधानांपुढे मांडल्यात.

 

.

First Published: Friday, July 20, 2012 - 21:29
comments powered by Disqus