पंतप्रधानांना दाखवले काळे झेंडे

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सपत्नीक दर्शनास आलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अण्णा हजारेंच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले.

Updated: Jan 1, 2012, 12:03 PM IST

झी २४ तास वेब टीम, अमृतसर

 

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सपत्नीक दर्शनास आलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अण्णा हजारेंच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले.

 

पंतप्रधान आपल्या पत्नीसह सुवर्ण मंदिरातून दर्शन घेऊन येत असताना अनेक अण्णा समर्थक स्त्री-पुरूषांनी भ्रष्टाचार विरोधात आणि लोकपालाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. समर्थकांनी पंतप्रधान परत जाच्या ही घोषणा दिल्या. त्यांनी मनमोहन सिंगांना छोटे काळे झेंडेही दाखवले. तृणमूल काँग्रेससहित इतर पक्षांनी केलेल्या विरोधामुळे २९ डिसेंबरला राज्यसभेत लोकपाल विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते.

 

पंतप्रधानांनी रविवारी सुवर्ण मंदिरात प्रार्थना करूवन नववर्ष २०१२ ची सुरूवात केली. मनमोहन सिंग आपली पत्नी गुरशरण कौर यांच्यासोबत साडे सहावाजता गुरूद्वारेत पोहोचले. तिथे प्रार्थना केली आणि भजन ऐकलं.