पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत

Last Updated: Tuesday, December 13, 2011 - 12:45

झी २४ तास वेब टीम, सुरत

 

सुरतमध्ये एक बिल्डिंग अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. पाच मजल्यांची ही बिल्डिंग मूळापासून कोसळून पडली. या बिल्डिंगच्या शेजारी दुस-या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. या बांधकामामुळेच शेजारी असणाऱ्या या बिल्डिंगला हादरे बसले, आणि त्याचा पाया कमकुवत झाला. यामुळेच संपूर्ण बिल्डिंग कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

 

या बिल्डिंगला भेगा पडल्याचं स्थानिकांच्या सकाळीच लक्षात आलं होतं. त्यामुळे ताबडतोब बिल्डिंग रिकामी करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण आजुबाजूच्या बिल्डिंग्सचं मोठं नुकसान झालंय.

 

सविस्त वृत्त थोड्याच वेळातFirst Published: Tuesday, December 13, 2011 - 12:45


comments powered by Disqus