पदभारातून मुक्त करा, चार मंत्र्यांची इच्छा

केंद्रात सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त करत राजीमाना देण्याची तयारी दर्शविली आहे. यात काँग्रेसचे वरिष्ठ नेता वायलर रवि, सलमान खुर्शीद, गुलाम नबी आझाद आणि जयराम रमेश यांचा समावेश आहे. त्यामुळे आता सरकारसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

Updated: Apr 24, 2012, 06:19 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

केंद्रात सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त करत राजीमाना देण्याची तयारी दर्शविली आहे. यात काँग्रेसचे वरिष्ठ नेता वायलर रवि, सलमान खुर्शीद, गुलाम नबी आझाद आणि जयराम रमेश यांचा समावेश आहे. त्यामुळे आता सरकारसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ता मनीष तिवारी यांनी अशा प्रकारे पद सोडण्यासंबधी माझ्याकडे काही माहिती नसल्याचे सांगितले आहे. तसेच पक्षाने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही सांगितले आहे.

या संदर्भात ऑस्कर फर्नांडिस यांना विचारले असता, ते म्हणाले, पक्षात अशा प्रकारचे फेरबदल होतच असतात. तर केंद्रीय मंत्री वायलर रवि यांना या संदर्भात विचारले असता, सोनिया गांधींना आपण कोणतेही पत्र पाठविले नसल्याचे सांगितले आहे. सध्या रवि पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे आंध्रप्रदेशात आहेत.

या चार मंत्र्यांनी अशा प्रकारे पद सोडण्याची तयारी का दाखविली या संदर्भात कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही. अंतर्गत बदलामुळे मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची कवायत सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वरील चार मंत्र्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे. त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचेही बोलले जात आहे. या चार मंत्र्यांनी सोनिया गांधी यांचीही भेट घेतली आहे.

.