बेळगावातली मुस्कटदाबी, 'तरुण भारत'वर कारवाई!

Last Updated: Tuesday, July 24, 2012 - 23:28

www.24taas.com, बेळगांव

 

बेळगाव तरुण भारतच्या छपाईचा परवाना रद्द करून संपादक किरण ठाकूर याच्यावर कारवाई करावी अशी शिफारस करणारा ठराव कर्नाटक विधिमंडळात आज करण्यात आला.

 

सीमावासीय मराठी भाषकांसाठी लढणारं वृत्तपत्र म्हणून बेळगाव तरुण भारतची ओळख आहे. आमदारांची बदनाम केल्याचा ठपका ठेवून विधिमंडळानं या वृत्तपत्रावर कारवाईची मागणी केली आहे. कर्नाटक विधिमंडळात या मुद्यावर आज अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर या वृत्तपत्राचा छपाई परवाना रद्द करून संपादक किरण ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

 

किरण ठाकूर यांना 30 जुलैला विधिमंडळात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणात लक्ष घालावं म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे साकडं घालण्यात आलंय.

First Published: Tuesday, July 24, 2012 - 23:28
comments powered by Disqus