भाजपचे सरकार लुटारू - सोनिया

Last Updated: Tuesday, January 17, 2012 - 16:32

 www.24taas.com, रुरकी

 

उत्तराखंडमधील नैसर्गिक ठेवा लुटला जात आहे. तसेच येथील जमिनीची तिच स्थिती आहे. त्यामुळे सरकारमध्ये बदल हा एकमेव ठेवा जनत करण्याचा मार्ग आहे, असे मत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मंगळवार येथे व्यक्त केले.

 

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत सभेत त्या बोलत होत्या.  नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट होताना पाहून मला प्रचंड वेदना होतात. हा उत्तराखंडवरील अन्याय आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्य निराशेच्या गर्तेत गेले आहे. केवळ मुख्यमंत्री बदलल्याने परिस्थितीत बदल होणार नाही. तर, सरकारच बदलण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

 

सोनिया गांधी यांनी भाजप सरकावर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्राकडून राज्यांसाठी देण्यात आलेल्या निधीतील केवळ ४० टक्केच निधी पोहोचत आहे. यातून भाजपचा विकासाचा मुखवटा दिसून येत आहे. येथील राज्यसकारचा खोटा पडदा कमी पडला आहे. राज्यात विकास ठप्प झाला आहे. कॉंग्रेसच्या काळात विकासच झाला आहे. मात्र, बाजपने विकास रोखला आहे, असा आरोप सोनिया यांनी केला.

 

भाजपने नुकताच मुख्यमंत्रीबदल केला आहे. त्याचाच आढावा सोनिया त्यांनी भाषणात घेतला.  केवळ मुख्यमंत्री बदलून चालणार नाही. पूर्ण सरकार बदलण्याची गरज आहे. त्यामुळे कॉंग्रेसला बहुमताने निवडून दिल्यास उसाला चांगला भाव दिला जाईल, असे आश्‍वासन सोनिया यांनी या वेळी दिले.

 First Published: Tuesday, January 17, 2012 - 16:32


comments powered by Disqus